गावाविषयी माहिती
प्रभू श्री रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पावन झालेले पिंपळगाव निपाणी हे गाव महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आहे एक छोटेसे प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २७५१ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २, अंगणवाडी केंद्रे २ व अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच सर्व देवी देवतांचे मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून कोबी कांदे,, सोयाबीन,व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. नाशिक जिल्यात लाल कांदा उत्पन्न मध्ये पिंपळगाव निपाणी गावाचा मोठा वाटा आहे.
पिंपळगाव निपाणी ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थींना घरकुल लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पिंपळगाव निपाणी गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF) दर्जा मिळवला आहे. जल जीवन मिशन व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
पिंपळगाव निपाणी गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.
भौगोलिक स्थान
पिंपळगाव निपाणी हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १८ कि.मी. अंतरावर व नाशिक शहरापासून ३२ किमी अंतरावर वसलेले आहे ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे. उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३८° से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात ७° से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.
लोकजीवन
पिंपळगाव निपाणी गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून कोबी, फुलकोबी, , कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व यामध्येही कार्यरत आहेत.
गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.
येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
पिंपळगाव निपाणी गावाच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.
लोकसंख्या
पिंपळगाव निपाणी
सावळी
सन २०११ नुसार
एकूण
संस्कृती व परंपरा
पिंपळगाव निपाणी गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व अखंड हरीनाम साप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.
गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.
स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.
यामुळे पिंपळगाव निपाणी गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.
प्रेक्षणीय स्थळे
- श्री खंडेराव महाराज मंदिर – श्री खंडेराव महाराज मंदिर हे गावातील प्रमुख देवतेचे मंदिर आहे हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी माघ पौर्णिमा ला खूप मोठी यात्रा,भरते खूप हा लांबून लांबून भाविक यात्रेसाठी येतात.
- हनुमान मंदिर – गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर उत्सव व सणासुदीला ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.
- स्मशान भूमी – पिंपळगाव निपाणी गावातील स्मशान भूमी हे पंचक्रोशीतील प्रमुख आकर्षण आहे. येथील निसर्गरम्य वातावरणामुळे या वैकुंठधाम परिसरास अनोखे आकर्षण आहे.
जवळची गावे
आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे पिंपळगाव निपाणी गावाशी सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.
रामनगर तळवाडे नायगाव हे आसपासची प्रमुख गावे आहेत.
गटविकास अधिकारी

गटविकास अधिकारी
ग्रामपंचायत प्रशासन

सौ. छाया खंडेराव बोडके
सरपंच
(+91 ) ९३०७५ ८४०२१

सौ. वत्सलाबाई बाळू बोडके
उपसरपंच
(+91 ) ९०११२ ०९६१२

श्री. ज्ञानेश्वर मल्हारी खाडे
सदस्य
(+91 ) ७५८८० ९७६१९

श्री. शिवाजी चिंधू खाडे
सदस्य
(+91 ) ९९२३७ ६९०७५

श्री. रामभाऊ बाबुराव बोडके
सदस्य
(+91 ) ८००७५ ६५७०८

श्री. पोपट रंगनाथ गांगुर्डे
सदस्य
(+91 ) ७७९८९ ६१३७०

सौ. अलका ज्ञानेश्वर खाडे
सदस्य
(+91 ) ९६३७१ ६२७२६

सौ. सिमा मच्छिंद्र कर्डक
सदस्य
(+91 ) ९६३७१ ६७५४५
समन्वय कर्मचारी
अ.नं. | नाव | विभाग पद | संपर्क क्रमांक |
---|---|---|---|
1. | श्रीमती. एस. के. गोसावी | ग्रामपंचायत अधिकारी | (+91) ९७६३४ ५८४९७ |
2. | श्री. प्रफुल गवळी | ग्राम महसूल अधिकारी | (+91) ९६२३३ ०८७८३ |
3. | श्री. शिवाजी नामदेव भालेराव | पोलीस पाटील | (+91) ९०४९२ ८२२७९ |
4. | श्री. संतोष लोहार | सहाय्यक कृषी अधिकारी | (+91) ९८२३८ २७९५१ |
5. | कोतवाल | ||
6. | श्री. रामनाथ शंकर जाधव | ग्रामपंचायत कर्मचारी | (+91) ९६२३६ ३१७३९ |
7. | श्री. तेजस सुभाष शिंदे | ग्रामपंचायत कर्मचारी | (+91) ९३७०३ ८१४७९ |
ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचेकडे मिळणारे दाखले
जन्म नोंद दाखला
मृत्यु नोंद दाखला
विवाह नोंदणी दाखला
दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
ग्रामपंचायत थकबाकी नसल्याचा दाखला
निराधार असल्याचा दाखला
नमुना ८ चा उतारा
शिक्षण विभाग
अंगणवाडी विभाग
विद्यार्थी संख्या
अंगणवाडी नाव | मुले | मुली | एकूण |
---|---|---|---|
अंगणवाडी 1 | 46 | 43 | 89 |
अंगणवाडी 2 | 26 | 34 | 60 |
एकूण | 72 | 77 | 149 |
अंगणवाडी सेविका माहिती
अ.नं. | नाव | पद नाम | संपर्क क्रमांक |
---|---|---|---|
1. | सौ.भारती शाम कडवे | अंगणवाडी सेविका | (+91) ८७८८६ ३९४७९ |
2. | सौ. ज्योती विलास खाडे | अंगणवाडी सेविका | (+91) ८७७२५ २८९७५ |
3. | सौ.सुमन दिलीप रोकडे | अंगणवाडी मदतनीस | (+91) ९९२३७ ०९६७४ |
4. | सौ.सोनाली सागर खाडे | अंगणवाडी मदतनीस | (+91) ७३८७९ ४६३३७ |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळी
विद्यार्थी संख्या
इयत्ता | मुले | मुली | एकूण |
---|---|---|---|
पहिली | 09 | 03 | 12 |
दुसरी | 06 | 07 | 13 |
तिसरी | 12 | 05 | 17 |
चौथी | 12 | 06 | 18 |
एकूण | 39 | 21 | 60 |
शिक्षक माहिती
अ.नं. | नाव | संपर्क क्रमांक |
---|---|---|
1. | श्री. विजय काकड सर | (+91) ९३७२४३९६५३ |
2. | श्री. सीताराम घोडेकर |
आरोग्य विभाग
अ.नं. | नाव | आरोग्य विभाग पद | संपर्क क्रमांक |
---|---|---|---|
1. | डॉ. सुजित कोशिरे | तालुका वैद्यकीय अधिकारी | (+91) 94227 57565 |
2. | डॉ. दाने | पी.एच.सी. वैद्यकीय अधिकारी | (+91) ९८८१२ ५८८०० | 3. | डॉ. बोरसे | उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी | (+91) ८९८३४ ३१४३४ |
4. | विक्रांत चौधरी | आरोग्य सेवक | (+91) ९९२२९ ०२९९१ |
5. | रवींद्र निचिते | आरोग्य सेविका | (+91) ९२७०५ ३५२४४ |
6. | सौ.ललिता अरुण कडवे | आशा वर्कर | (+91) ७७६७८ २५२३३ |
7. | सौ.चेतना बाळकृष्ण कर्डक | आशा वर्कर | (+91) ९७६५१ ५२२४३ |
बचत गट
CRP : सौ.सुजाता रामनाथ बोडके
अ.नं. | नाव |
---|---|
1. | मौउली स्वयं सहायता महिला बचत गट |
2. | प्रगती स्वयं सहायता महिला बचत गट |
3. | भूमिका स्वयं सहायता महिला बचत गट |
4. | आदर्श स्वयं सहायता महिला बचत गट |
5. | जागृती स्वयं सहायता बचत गट |
6. | प्रेरणा स्वयं सहायता बचत गट |
7. | गीताइ स्वयं सहायता बचत गट |
8. | रमाइ स्वयं सहायता बचत गट |
9. | ईश्वरी स्वयं सहायता बचत गट |
10. | वृंदावन स्वयं सहायता बचत गट |
11. | साई मल्हार स्वयं सहायता बचत गट |
12. | मातोश्री स्वयं सहायता बचत गट |
13. | राजेश्वरी स्वयं सहायता बचत गट |